Thursday 15 October 2015

हिंगोली जिल्हा

[7:31PM, 15/10/2015] Chhaya mundkar/Mundlod: हिंगोली हा जिल्हा राज्यातील अगदी अलीकडच्या काळात म्हणजे १९९९ साली अस्तित्त्वात आलेला हा जिल्हा असून, संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन असलेल्या “पहिल्या ज्ञानेश्वर चरित्रकाराचा” म्हणजे संत नामदेवांचा हा जिल्हा प्रत्येक मराठी माणसाला वंदनीय आहे. औंढा नागनाथाचे ज्योतिर्लिंग मंदिर हे या जिल्ह्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
हिंगोली जिल्ह्याचा इतिहास

भारताच्या स्वातंत्र्यानंतरही हिंगोली जिल्ह्याचा भाग हा हैद्राबादच्या निजामाच्या ताब्यात होता. मराठवाड्यातील हैद्राबात मुक्तिसंग्रामात हिंगोली, बामणी इत्यादी गावे आघाडीवर होती. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय भागात मराठवाड्यात वसलेला हा या विभागातील आठवा जिल्हा ठरला. इतिहासात हिंगोलीचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. हे शहर स्वातंत्र्याआधी निजामाच्या अधिपत्याखाली होते. विदर्भाच्या सीमेवरील ठिकाण असल्यामुळे, निजामाचा महत्त्वाचा लष्करी तळ या जिल्ह्यात होता. त्या काळात सैन्यदलाला व पशुंना वैद्यकीय सेवा ह्या हिंगोलीतून कार्यरत होत्या. हिंगोलीने दोन मोठी युद्धे अनुभवली आहेत, पहिले १८०३ साली टिपू सुलतान व मराठा यांच्यातील युद्ध तर दुसरे १८५७ साली नागपूरकर व भोसले यांच्यातील युद्ध होय.

लष्करी ठाणे असल्यामुळे, हैद्राबाद राज्यातील हिंगोली हा भाग महत्त्वपूर्ण घटक मानला जात असे. स्वातंत्र्योत्तर काळात हा जिल्हा मुंबई प्रांताच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतर १९६० मध्ये हा भाग परभणी जिल्ह्यात समाविष्ट होतो.तर ३९ वर्षांनंतर म्हनजे १ मे,१९९९ मध्ये हा स्वतंत्र जिल्हा बनविण्यात आला.
पर्यटन:
भारतातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे औंढा- नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे हेमाडपंती मंदिर असून ते द्वादशकोनी व शिल्पसमृद्ध आहे. धर्मराजाने हे मंदिर महाभारतकाळात बांधल्याचं एका आख्यायिकेत म्हटलं आहे.

३०० वर्षांपूर्वीचे मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर जिल्ह्यात शिरड-शहापूर येथे आहे. तर नरसी येथील नृसिंहाचे मंदिर प्रसिद्ध आहे. नरसी हेच संत नामदेवांचे जन्मगाव असल्याचे मानले जाते. तर जवळच बामणी येथील अन्नपूर्णा व सरस्वती देवीची देऊळंही प्रेक्षणीय आहेत.
नामवंत व्यक्तीमत्वे

हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला. संत नामदेवांचे गुरू विठोबा खेचर यांचेही वास्तव्य या जिल्ह्यात होते.

No comments:

Post a Comment