Saturday 31 October 2015

★|| eMPSCkatta ||★

►►:सामान्य ज्ञान: 325 प्रश्नोत्तरे::◄◄««

Q1. बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे? -B.चंद्रपूर

Q2. राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे? -C. नाशिक

Q3. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? -B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Q4. खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते -A. नाशिक

Q5. 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती? -B. 7 वी

Q6. राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे? -B. धुळे

Q7. मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम. (GSM) मधील 'एस' म्हणजे__ -D. System

Q8. आदिवासी वन संरक्षण कायदा कोणत्या साली पारित झाला? -C. 2004

Q9. बाभळी प्रकल्प कोणत्या दोन राज्यामधील वादाचा मुद्दा बनला? -C. महाराष्ट्र - आंध्रप्रदेश

Q10. मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way) कोणाचे नाव देण्यात आले आहे? -A. यशवंतराव चव्हाण

Q11. 'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला? -C. एम. विश्वेश्वरैय्या

Q12. Q12. ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली? -C. कंबोडिया

Q13. अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या कोणत्या गुरुद्वारास नुकतीच १०० वर्षे पूर्ण झालीत? -C. स्टोकटोन गुरुद्वारा साहिब

Q14. खालील पैकी कोणत्या राज्यातील एका दलित वस्तीस नुकतेच म्यानमार च्या नेत्या आन सान्ग स्यू की ह्यांचे नाव देण्यात आले आहे? -C. आंध्र प्रदेश

Q15. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच पाकिस्तान भेटीदरम्यान तक्षिला या प्राचीन शहरास भेट दिली, तक्षिला पाकिस्तानातील कोणत्या प्रांतात आहे? -B. पंजाब

Q16. नुकतेच कोणत्या देशातील संसदेने १९८४ सालच्या शीख विरोधी दंग्यांना "जाती संहार" (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे? -B. ऑस्ट्रेलिया

Q17. 2 ते 6 जानेवारी 2013 ह्या कालावधीत कोची (केरळ) येथे झालेल्या प्रवासी भारतीय दिवसाचे मुख्य अतिथी कोण? -A. राजकेश्वर पुरयाग (Mauritius)

Q18. डिसेंबर २०१२ मध्ये आयोजित बारामती (जिल्हा: पुणे) येथे होणार्‍या नाटय़संमेलनाचे अध्यक्षस्थान कोण भूषविणार आहे? -A. डॉ. मोहन आगाशे

Q19. World Economic Forum ने जारी केलेल्या आर्थिक विकास सूची मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? -D. 40वा

Q20. 2012 चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणास मिळाला आहे? -C. गुलजार

Q21. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? -D. नंदुरबार

Q22. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? -मुंबई उपनगरे

Q23. ११व्या योजनेत सर्वाधिक खर्चाच्या पहिल्या ३ क्षेत्रांचा उतरता क्रम लावा.
अ. ऊर्जा ब. सामाजिक सेवा क. वाहतूक
-B. ब. अ. क.

Q24. केंद्रीय नियोजन मंडळ खालील पैकी कोणाच्या अधिनस्थ कार्य करते? -D. पंतप्रधान कार्यालय

Q25. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालील पैकी कशात घट झाली नाही? -D. किमतींचा निर्देशांक

Q26. महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? -B. पालक मंत्री

Q27. 1936 मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला? -B. एम. विश्वेश्वरैय्या

Q28. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले? - भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics, पिंप्री

Q29. भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली? -C. 88 वी

Q30. घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले आहे? -C. वार्षिक वित्तीय विवरण पत्र

Q31. महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता 'इक्रिसॅट' (Icrisat) तंत्र अवलंबिले जाते? -D. भुईमूग

Q32. खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे? -B. मालदांडी -35-1

Q33. भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली? -D. 1966 - 67

Q34. देशातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते मुख्यमंत्री कोण? -D. गोविंद वल्लभ पंत (1957)

Q35. खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते? -A. सूर्यफूल

Q36. 2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला? -A. वार्‍याने हालते रान

Q37. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात? -D. 1921

Q38. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे? -A. 925

Q39. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर ___ असे करण्यात आले. -B. रायगड

Q40. "स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन" हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते? -C. मार्गदर्शक तत्त्वे

Q41. ठक्कर बाप्पा यांनी __ या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे? -B. आदिवासी कल्याण

Q42. आगरकरांनी १५ ऑक्टोबर १८८८ रोजी सुरु केलेल्या 'सुधारक' या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते (English Edition)? -B. गो. कृ. गोखले

Q43. __ यांनी रत्नागिरी येथे 'पतित पावन मंदिर' बांधले. -C. स्वातंत्र्यवीर सावरकर

Q44. अमरावती येथे सन १९३२ मध्ये 'श्री शिवाजी शिक्षण संस्थे'ची स्थापना कोणी केली? -A. डॉ. पंजाबराव देशमुख

Q45. __ हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित झाला. -B. सार्वजनिक सत्यधर्म

Q46. खालील पैकी कोणास 'काळकर्ते परांजपे' म्हणून ओळखले जाते? -A. रघुनाथराव परांजपे

Q47. "आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील " हा निबंध __ यांनी लिहिला. -A. गोपाळ गणेश आगरकर

Q48. खालील पैकी कोणी 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' चे अध्यक्ष पद भूषविले होते? -B. शाहू महाराज

Q49. 'सब भूमी गोपाल की' व 'जय जगत' या घोषणांचे व त्यामागील विचार धारेचे श्रेय __ यांना जाते. -C. विनोबा भावे

Q50. 'भारतीय सामाजिक परिषदे' च्या स्थापनेचे श्रेय न्यायमूर्ती रानडे यांना जाते, कोणत्या वर्षी या परिषदेची स्थापना करण्यात आली? -A. 1887

Q51. संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा 'आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार' या वर्षी कोणाला जाहीर झाला आहे? -B. यमुनाबाई वाईकर

Q52. खालील पैकी कोणता व्हिडीओ नुकताच यु-ट्यूब वरील सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ ठरला आहे? (more than 80crore views) -A. गैंगनाम स्टाइल

Q53. शालेय स्तरावर संगणकामार्फत शिक्षण देण्याच्या हेतूने खालील पैकी कोणती योजना सुरु करण्यात आली? -A. B. विद्यावाहीनी

Q54. भारताचे पहिले विज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले? -B. 1958

Q55. ' Y2K ' ही संगणक क्षेत्रातील समस्या कोणत्या वर्षाशी संबंधित होती? -B. 2000

Q56. I.C.T. ही शाखा म्हणजे __ -B. Information Communication Technology

Q57. IBM ह्या कंपनीच्या Artificial Technology वर आधारित ___या Chess Program ने garry kasparov या बुद्धिबळ पटूस मात दिली होती. -B. Deep Blue

Q58. इंदिरा पॉइंट काय आहे? -B. भारताचे दक्षिण टोक

Q59. 127.0.0.1 ह्या I.P Address ला ____ I.P Address म्हणतात. -B. Loop Back

Q60. Java Script हे product या कंपनीचे आहे. -B. Net Scape

Q61. कोणी १९०१ साली बोलपूर मध्ये 'शांतीनिकेतन' ची स्थापना केली? -B. रवींद्र नाथ टागोर

Q62. 'राष्ट्रासभे' ची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? -A. लॉर्ड डफरीन

Q63. खालील पैकी कोण 'राष्ट्रसभे' च्या पहिल्या अधिवेशनास हजर नव्हते? -D. महात्मा गांधी

Q64. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते? -B. जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर

Q65. 'वंदे मातरम' हे वृत्तपत्र अरविंद घोष चालवीत होते, तर त्यांचे बंधू बारीन्द्र घोष __ हे वृत्तपत्र चालवीत. -C. युगांतर

Q66. १९१९ साली भरलेल्या अखिल भारतीय खिलापत चळवळीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? -B. महात्मा गांधी

Q67. खालील पैकी कोणी देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढवून घेतला होता? -A. लॉर्ड लिटन

Q68. आपण समाजवादी असल्याचे कॉंग्रेस च्या कोणत्या अध्यक्षाने स्पष्टपणे जाहीर केले होते? -A. पंडित नेहरू

Q69. आंध्र राज्य हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणत्या साली अस्तित्वात आले? -A. 1953

Q70. चीन ने भारतावर हल्ला केला, त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? -B. व्ही. के. कृष्ण मेनन

Q71. कोणत्या खेळात भारताने पहिले कॉमनवेल्थ पदक मिळवले? - C. रेसलिंग (wrestling)

Q72. धारा ३७१ कोणत्या दोन भारतीय राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे ? - B. महाराष्ट्र व गुजरात

Q73. मिठाचा कायदा मोडून महात्मा गांधीजींनी सुरू केलेली चळवळ? -D. सविनय कायदेभंग चळवळ

Q74. खालील पैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? (By Length) -A. NH7

Q75. कला व कलेचा प्रचार करण्यासाठी १९५४ मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली गेली होती? -A. ललित कला अकादमी

Q76. फार्मूला वन फोर्स इंडिया संघाचे मालक कोण आहे?
-D. विजय मल्ला

Q77. YCMOU ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? -C. 1989

Q78. धर्म, जात, वंशाचा भेदभाव न करता कोणत्या भारतीय राज्यात कुटुंबाशी संबंधीत पोर्तुगाली आचार संहितेवर आधारित कायदे अमलात आणले जातात? -A. गोवा

Q79. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवित आहे? -D. सुकन्या

Q80. नवी दिल्ली येथील ऐजाबाद बाग सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते? -A. शालीमार गार्डन

Q81. या पैकी कोणत्या बेटाचे नाव स्पॅनिश भाषेतील जमीनीवर आढळणार्‍या कासवांच्या नावावरून ठेवले गेले होते? -B. गेलापॅगोस

Q82. कॉम्प्यूटरमध्ये वापरल्या जाणार्‍या संचार नियमांना काय म्हटले जाते? -B. प्रोटोकॉल

Q83. हिमाचल प्रदेशात कोणता सण देशातील इतर स्थानांपेक्षा तीन दिवस नंतर साजरा केला जातो? -B. दसरा

Q84. 2001 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला संयुक्त राष्ट्र शांतिदूत नियुक्त केले गेले होते? -C. विजय अमृतराज

Q85. पूर्वी घाटातील सर्वोच्च शिखर अर्मा कोंडा कोणत्या भारतीय राज्यात आहे? -B. आंध्र प्रदेश

Q86. भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी कोणती? -A. नर्मदा

Q87. जीआयएफ (GIF) चा विस्तार काय आहे? -B. ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट

Q88. हिमरू कला भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? -A. कर्नाटक

Q89. कोणते भारतीय नृत्य 'सादिर नाच' (Sadir Dance) या नावाने प्रसिद्ध होते? -A. भरतनाट्यम

Q90. बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध असलेले स्थान तवांग हे कोणत्या राज्यात आहे? -A. अरुणाचल प्रदेश

Q91. खालील पैकी कोणत्या राज्याने 1 ऑगस्ट 2012 नंतर निवृत्ती वेतनास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी 'ई-पेन्शन' पद्धती कार्यान्वित केली? -D. हरियाणा

Q92. कोणत्या राज्याने अलीकडेच 25 ते 40 वर्षे वयो गटातील आणि वार्षिक 36 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील बेरोजगारां साठी दरमहा 1000 रुपये बेरोजगार भत्ता सुरु केला? -B. उत्तरप्रदेश

Q93. राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो? -C. अहिल्याबाई होळकर

Q94. महाराष्ट्रातील _____ जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले जाते. -C. गडचिरोली

Q95. भोपाळ वायुदुर्घटना ______या वर्षी घडली होती. -D. 1984

Q96. Blue Print for Survival हे पर्यावरण विषयी पुस्तक _____ यांनी लिहिले आहे. -C. सरला बेन

Q97. जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो? -C. 24 नोव्हेंबर

Q98. 'ज्ञानवाणी' हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे? -A. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

Q99. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? -B. वैनगंगा

Q100. राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात केव्हा सुरु करण्यात आली? -D. 2 जुलै 2012

Q101. महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा राज्य पातळीवर _____म्हणून साजरा करते. -A. सामाजिक न्याय दिन

Q102. दिल्ली जवळील नोएडा येथे सुरु झालेले फॉर्मुला-1 (F-1) कार रेसिंग सर्किट कोणत्या नावाने ओळखले जाते? -D. बुध्द इंटरनॅशनल सर्किट

Q103. प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले आहेत? -B. 13वे

Q104. लंडन ऑलंपिक २०१२ मध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकलीत? -C. 6

Q105. Senkaku Islands चा वाद कोणत्या दोन राष्ट्रां दरम्यान आहे? -C. चीन व जपान

Q106. मुंबईतील व्हिक्टोरिया गार्डनचे नामकरण कोणत्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या नावावरुन केले गेले? -B. जिजामाता

Q107. या पैकी कॉम्प्यूटर मधील मेमरी लोकेशन कोणते आहे? -D. रजिस्टर

Q108. कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे? -B. सिक्किम

Q109. संगणकातील 'वर्ड प्रोसेसर' या प्रणालीत कोणत्या सुविधेमुळे एका ओळीत शब्द मावत नसल्यास आपोआप दुसर्‍या ओळीच्या सुरवातीला घेतला जातो? -B. वर्ड रॅप

Q110. शिप्रा नदीच्या उपनद्या सरस्वती व खान कोणत्या शहरात आहेत? -B. इंदूर

Q111. एनएम इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्यूटर कंपनीला आता कोणत्या नावाने ओळखले जाते? -D. इंटेल

Q112. फॉस्बरी फ्लॉप' कोणत्या ऍथलिटिक खेळाशी संबंधित आहे? -A. उंच उडी

Q113. पश्चिम बंगाल येथे बेलूर मठाची स्थापना कोणी केली होती? -A. स्वामी विवेकानंद

Q114. संयुक्त राष्ट्र २० जून हा दिवस कोणत्या स्वरूपात साजरा करते? -B.वर्ल्ड रिफ्यूजी डे

Q115. भारतातील कोणते ठिकाण प्रवासी पक्षांसाठी प्रसिद्ध आहे जेथे त्यांचा मृत्यु होतो? -D. जतिंगा

Q116. ऍडमिरलस्‌ ,झेब्राज्‌ व मोनार्कज्‌ या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत? -C. फुलपाखरु

Q117. टिहरी बांध कोणत्या नदीवर बनलेला आहे? -B. भागीरथी

Q118. कोणत्या व्यवसायातील लोकांना 'हिप्पोक्रेटिक शपथ' घ्यावी लागते? -B. चिकित्सक

Q119. लाहोर द्वार कोणत्या प्रख्यात स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार आहे? -B. लाल किल्ला

Q120. झेरॉक्स कॉर्पोरेशनने लोकल एरीया नेटवर्कसाठी कोणत्या प्रोटोकॉलचा विकास केला होता? -B. ईथरनेट

Q121. डिफेन्स इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन लॅबोरेटरी कोठे आहे? -C. देहरादून

Q122. अर्जुन, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न सन्मानाने गौरविण्यात आलेला भारतीय टेनिस खेळाडू कोण? -C. लिएंडर पेस

Q123. पटचित्र भारताच्या कोणत्या राज्यातील लोक चित्रकला आहे? -B. ओरिसा

Q124. या पैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरघळू शकते? -D. व्हिटॅमिन सी

Q125. 1947 मध्ये हैदराबाद संस्थानाशी बोलणी करण्यासाठी भारत सरकारने कोणाची नियुक्ती केली होती? -A. के.एम. मुंशी

Q126. खालील पैकी कोणते राज्य उत्तराखंड च्या सीमेला लागून आहे? -B. हिमाचल प्रदेश

Q127. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते? -A. मौलाना अबुल कलाम आझाद

Q128. अलाई दरवाजा कोणत्या स्मारकाचा हिस्सा आहे? -C. कुतुब मीनार

Q129. ऑस्ट्रेलिया विरूध्द कसोटी शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? -B. विनू मंकड

Q130. परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते? -D. राष्ट्रपती

Q131. कुंजूराणी देवी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? -A. वेटलिफ्टींग

Q132. या पैकी कोणते वन्यपशु उद्यान माथंगुरी या नावाने देखील ओळखले जाते? -D. मानस वाघ राखिव उद्यान

Q133. स्मार्टसूट हे पॅकेज कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे? -C. र्लोटस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन

Q134. क्रिप्स मिशन अयशस्वी झाल्यानंतर कोणत्या आंदोलनाची सुरूवात झाली होती? -A. भारत छोडो आंदोलन

Q135. या पैकी कोणता फॉरमॅट कम्प्यूसर्व्ह द्वारे बनवलेला पिक्चर फाइल फॉरमॅट आहे? -B. जिफ (GIF)

Q136. भारतीय संविधानातील कलम ५० च्या अंतर्गत काय प्रावधान आहे? -A. न्याय पालिका व कार्यपालिका यांचे विभाजन

Q137. भारताच्या कोणत्या व्हाइसरॉयने पोर्ट ब्लेयरची स्थापना केली होती? -D. लॉर्ड मेयो

Q138. गोलकोंडा खाण भारतातील कोणत्या राज्यात आहे? -A. आंध्र प्रदेश

Q139. BRIC देशांच्या गटात C या नावापासून सुरू होणारा देश कोणता? -A. चीन

Q140. आशियातील ताज्या पाण्याचा सर्वांत मोठा तलाव कोणता? -A. वूलर तलाव

Q141. सायलेंट व्हॅली कोणत्या राज्यात आहे? -B. केरळ

Q142. जामनगर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे? -A. गुजरात

Q143. सध्याच्या लोकसभे तील विरोधी पक्ष नेते म्हणून ___ यांचा उल्लेख करावा लागेल. -C. सुषमा स्वराज

Q144. जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यात आहे? -A. राजस्थान

Q145. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे? -B. बियास

Q146. जम्मू काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प __नदीवर आहे. -C. चिनाब

Q147. जर एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज 2795 आणि सरासरी 65 असेल, तर वर्गातील विद्यार्थी संख्या किती? -C. 43

Q148. माऊंट अबू कोणत्या पर्वत रांगेत आहे? -A. अरवली

Q149. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे? -D. तिरुवनंतपुरम

Q150. शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवर आहे? -A. कावेरी

Q151. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे? -B. मध्य प्रदेश

Q152. __ हा देशातील भारतरत्‍न नंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. -D. पद्‍म विभूषण

Q153. 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद ___ ह्यांनी भूषविले. -A. राजर्षी शाहू महाराज

Q154. इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत? -A. सेवा

Q155. __ ह्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात. -D. औरंगाबाद

Q156. जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक __ नियम लागू होतो. -C. तिसरा

Q157. दुधात __ ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते. -D. शर्करा

Q158. अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत आलेले पद्‍मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे? -A. केरळ

Q159. राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे? -B. 368

Q160. गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते? -B. लोकसंख्या

Q161. आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या __ ह्या संस्थेचे शुभचिंतक होते. -D. शारदा सदन

Q162. अतिरिक्त मद्यपानाने __ ची कमतरता जाणवते. -A. थायामिन

Q163. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे? -A. रांची

Q164. फेकरी कोणत्या हा औष्णिक विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे? -D. जळगाव

Q165. _ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. -B. संगमरवर

Q166. 1917 व 1934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत? -A. मणि भवन

Q167. भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते? -B. आयएनएस गरुड

Q168. कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे? -A. सिंक्रोनस डायनॅमिक रॅम

Q169. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत? -B. लक्षद्वीप

Q170. कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे? -C. सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल

Q171. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? -B. १२ लाख चौ.कि.मी.

Q172. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार __ -B. दख्खनचे पठार

Q173. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? -D. मध्य प्रदेश

Q174. महाराष्ट्राच्या ___ कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? -C. उत्तरे

Q175. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात. -B. निर्मळ रांग

Q176. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते? -A. नदीचे अपघर्षण

Q177. लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत? -D. किन्हाळा

Q178. दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे? -D. Lignite

Q179. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? -D. औरंगाबाद

Q180. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो? -B. पाचगणी

Q181. कोणत्या व्यक्तीला भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे? -A. मेरी क्यूरी

Q182. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या लोगोवर या पैकी कशाचे चित्र आहे? -B. धनेश

Q183. नॅस्डॅक मधे प्रवेश मिळवणार्‍या प्रथम भारतीय कॉम्प्यूटर कंपनी कोणती? -B. इन्फोसिस टेक्नोलॉजी लिमिटेड

Q184. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे? -B. आसाम

Q185. यलम्मा, महाकाली, मैसम्मा, पोचम्मा आणि गुंडम्मा या देवतांची पूजा कोणत्या सणादिवशी केली जाते? -B. बीहु

Q186. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? -C. मणिपूर

Q187. स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती कोण? -D. जी.एम.सी. बालयोगी

Q188. भारतीय घटने नुसार कलम 199 काय आहे? -A. धन विधेयकाची व्याख्या

Q189. भारतातील सर्वांत जूनी आयआयटी कोठे आहे? -B. खरगपूर

Q190. कॉम्प्यूटरच्या भाषेत 'CAD' चा अर्थ काय आहे? -A. कॉम्प्यूटर ऍडेड डिझाइन

Q191. प्रजासत्ताक दिनी सैन्यदलांची मानवंदना कोण स्वीकारतो? -A. राष्ट्रपती

Q192. कोणाच्या नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकरने आपली टेस्ट क्रिकेट कारकिर्द सुरु केली होती? -A. के. श्रीकांत

Q193. कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात 'सालूनो' म्हटले जाते? -A. रक्षा बंधन

Q194. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता? -B. मरियाना गर्ता

Q195. श्यामाप्रसाद मुखर्जी कोणत्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते? -B. भारतीय जन संघ

Q196. किशोरी आमोणकर कोणत्या घराण्याशी संबंधित आहेत? -D. जयपुर

Q197. धर्म व धर्मशास्त्र यांच्या वर अधिक चर्चा व्हावी या उद्देशाने कोणत्या समाज सुधारकाने १८१५ मध्ये आत्मीय सभेची सुरुवात केली होती? -A. राजा राममोहन राय

Q198. कानपुर मेमोरियल चर्च' कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ बनवले गेले होते? -B. १८५७ च्या मृत इंग्रज सैनिकांसाठी

Q199. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे? -D. राजस्थान

Q200. असेट इंटरनॅशनल हा कोणत्या संस्थानाचा तंत्रज्ञान प्रशिक्षण विभाग आहे? -D. ऍप्टेक लिमिटेड

Q201. भारतीय राज्य घटनेतील धारा ३४५-३५१ कशाशी संबंधित आहेत? -A. अधिकृत भाषा

Q202. राष्ट्रीय मेंदू संशोधन संस्था कोठे आहे? -D. गुरगाव

Q203. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते? -C. दुर्गा

Q204. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे? -C. प्रशांत महासागर

Q205. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे? -C. शुक्र

Q206. झिरोग्राफीचा संशोधक कोण? -A. चेस्टर चार्ल्सट्न

Q207. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत? -A. गोदावरी

Q208. या पैकी कोणती भारतीय भाषा सिंगापूरच्या चार अधिकृत भाषांपैकी एक आहे? -B. तामिळ

Q209. भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते? -A. आसाम

Q210. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत? -C. मणिपुरी

Q211. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे? -B. महाराष्ट्र

Q212. मोठा पांडा कोणत्या संस्थेचे मानचिन्ह आहे? -A. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर

Q213. भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना पहिल्यांदा कोर्टाद्वारे समन्स जारी करण्यात आले होते? -C. पी.व्ही. नरसिंहराव

Q214. 'अक्रोबॅट' हा प्रोग्राम कोणत्या कंपनीचा आहे. या द्वारे उपयोगकर्ता ग्राफिक व लेआऊट असलेले दस्तावेज पाहु शकतो? -C. Adobe

Q215. सन 1931 मध्ये इंडियन नॅशनल सायन्स एकेडमीची स्थापना कोणी केली? -B. मेघनाद साहा

Q216. खालीलपैकी कोणत्या धातूशी पार्‍याचा संयोग होत नाही? -B. लोह

Q217. कॉम्प्यूटरच्या क्षेत्रात 'एफएलओपी'चे विस्तृत रूप काय आहे? -C. फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स पर सेकंड

Q218. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्‍यांद्वारे साजरा केला जातो? -D. आंध्र प्रदेश

Q219. ढाका येथील नवाब सलीमुल्लाने 1906 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? -D. मुस्लिम लीग

Q220. 'मालाबार प्रिन्सेस' कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? -D. एअर इंडियाचे आंतरराष्ट्रीय उड्डाण भरणारे प्रथम विमान

Q221. अशियातील सर्वात मोठे चर्च कोठे आहे? -D. गोवा

Q222. यातील कोणता अवयव एंडोक्राइन आणि एक्सोक्राइन ग्रंथींचे कार्य करते? -C. स्वादुपिंड

Q223. कलमकारी कोणत्या राज्यातील वैशिष्ठ्यपूर्ण 'हस्तशिल्प' कला आहे? -C. आंध्रप्रदेश

Q224. कोणत्या प्रकारच्या जीवांना फुफ्फुस नसते? -B. मासे

Q225. व्हाइट टॉवर आणि लेटाइन टॉवर कोणत्या स्मारकाचे भाग आहेत? -A. टॉवर ऑफ लंडन

Q226. वि दा सावरकर यांना कोणत्या तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगायला ठेवले होते? -B. सेल्यूलर जेल

Q227. बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली होती? -A. पंडित मदनमोहन मालविय

Q228. भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीत चारबाघ रेल्वे स्टेशन आहे? -C. लखनौ (U. P.)

Q229. बंगालच्या एशियाटीक सोसायटीचे संस्थापक कोण होते? -C. सर विल्यम्स जॉन्स

Q230. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे? -C. अरूणाचल प्रदेश

Q231. कॉम्प्यूटरच्या कोणत्या फाइलचे एक्सटेंशन 'bmp' असते? -A. बिटमॅप फाइल

Q232. पायोली एक्सप्रेस' या नावाने कोणती भारतीय ऍथलीट प्रसिद्ध आहे? -D. पी.टी. उषा

Q233. या पैकी कोणत्या पदार्थाचे रासायनिक चिन्ह 'Hg' आहे? -A. पारा

Q234. यापैकी कॉम्प्यूटरच्या कोणत्या भाषेला गणितीय संकल्पनांना समजण्यासाठी विकसित केले आहे? -A. लोगो

Q235. वेबसाईटच्या नावाआधी असलेले HTTP कशाचा संक्षेप आहे? -A. हायपर टेक्स्ट ट्रांसफर प्रोटोकॉल

Q236. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? -C. महाराष्‍ट्र

Q237. यापैकी कोणता धातू लोखंडापेक्षा कठीण आहे? -A. निकेल

Q238. कॉम्प्यूटरम ध्ये 'ए एस सी आय आय' (ASCII) याचा अर्थ काय आहे? -A. अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज

Q239. भारतात अंधांसाठी सन 1887 मध्ये पहिली शाळा कोठे सुरू करण्यात आली? -B. अमृतसर

Q240. खालीलपैकी कशाचे मोजमाप रिम्स किंवा कॅलिपरने घेतले जाते? -C. कागद

Q241. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते? -B. हिमाचल प्रदेश

Q242. महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मुळ नाव कोणते? -C. शेगाव

Q243. फिग्रीन ऑफ गोरा देव' ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?(tribal horse God) -A. गुजरात

Q244. जे लोक कॉंग्रेसवर वार करतात आणि नेहरूंना अभय देतात, ते मुर्ख आहेत. त्यांना राजकारण कळत नाही' हे वाक्य कोणी म्हटले होते? -A. डॉ. बी.आर. आंबेडकर

Q245. कोणते सॉफ्टवेअर वापरल्यास उच्चस्तरीय कॉम्प्युटर भाषेस एक्झिक्युटेबल मशीन इन्स्ट्रक्शन्स मध्ये बदलता येते? -A. कंपायलर

Q246. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? -D. राजस्थान

Q247. कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे? -B. सिक्किम

Q248. इसाक पिटमॅनने कशाचा शोध लावला? -D. शार्टहँड

Q249. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे? -D. मध्य प्रदेश

Q250. कॉम्प्यूटरच्या रॉममधील (ROM) स्थायी रूपात सुरक्षित कॉम्प्यूटर प्रोग्रामचे नाव काय आहे? -C. फर्म वेयर

Q251. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? -B. १२ लाख चौ.कि.मी.

Q252. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार __ -B. दख्खनचे पठार

Q253. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? -D. मध्य प्रदेश

Q254. महाराष्ट्राच्या ___ कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? -C. उत्तरे

Q255. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात. -B. निर्मळ रांग

Q256. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते? -A. नदीचे अपघर्षण

Q257. लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत? -D. किन्हाळा

Q258. दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे? -D. Lignite

Q259. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? -D. औरंगाबाद

Q260. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो? -B. पाचगणी

Q261. कोणत्या व्यक्तीला भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे? -A. मेरी क्यूरी

Q262. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या लोगोवर या पैकी कशाचे चित्र आहे? -B. धनेश

Q263. नॅस्डॅक मधे प्रवेश मिळवणार्‍या प्रथम भारतीय कॉम्प्यूटर कंपनी कोणती? -B. इन्फोसिस टेक्नोलॉजी लिमिटेड

Q264. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे? -B. आसाम

Q265. यलम्मा, महाकाली, मैसम्मा, पोचम्मा आणि गुंडम्मा या देवतांची पूजा कोणत्या सणादिवशी केली जाते? -B. बीहु

Q266. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? -C. मणिपूर

Q267. स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती कोण? -D. जी.एम.सी. बालयोगी

Q268. भारतीय घटने नुसार कलम 199 काय आहे? -A. धन विधेयकाची व्याख्या

Q269. भारतातील सर्वांत जूनी आयआयटी कोठे आहे? -B. खरगपूर

Q270. कॉम्प्यूटरच्या भाषेत 'CAD' चा अर्थ काय आहे? -A. कॉम्प्यूटर ऍडेड डिझाइन

Q271. VAT कर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते? -B. हरियाणा

Q272. भारतात VAT कर प्रणाली लागू करण्याची प्रथम शिफारस राष्ट्रीय विकास परिषद ने केव्हा केली होती? -A. 1956-57

Q273. महाराष्ट्रात VAT कर प्रणाली कधी लागू करण्यात आली? -B. 1 एप्रिल 2005

Q274. घाउक किंमत निर्देशांक हा कमीत कमी किती कालावधी साठी काढला जातो? -A. 1 आठवडा

Q275. खालील पैकी चलन वाढीचे कोणते कारण मागणीच्या बाजूचे आहे? -A. तुटीचा अर्थ भरणा

Q276. घाउक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष बदलविण्याची शिफारस __ अध्यक्षते खालील कार्य गटाने केली. -D. अभिजित सेन

Q277. पहिल्या पंचवार्षिक योजनेत __ मध्ये वाढ झाली नाही. -D. किंमतींचा निर्देशांक

Q278. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत __ मध्ये घट झाली नाही. -D. किंमतींचा निर्देशांक

Q279. कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात? -C. सातवी

Q280. केंद्रीय नियोजन मंडळ कोणाच्या अधिनस्थ कार्य करते? -D. पंतप्रधान कार्यालय

Q281. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे? -B. मध्य प्रदेश

Q282. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? -C. नंदुरबार

Q283. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते? -A. केरळ

Q284. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? -B. 1945

Q285. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी पास केला? -C. लॉर्ड लिटन

Q286. 'बंदी जीवन' ह्या क्रांतीकारकांना स्फूर्तीदायी ठरलेल्या पुस्तकाचे लेखन कोणी केले? -D. सचिंद्रनाथ संन्याल

Q287. 'टिळक स्कूल ऑफ पॉलीटीक्स' ची स्थापना कोणी केली होती? -B. लाला लजपतराय

Q288. आजतागायत किती क्रिकेटपटूना राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे? -A. दोन

Q289. संगणकीय परिभाषेत BITS म्हणजे काय? -B. Binary Digits

Q290. लोकसभे वर व राज्य सभेवर महाराष्ट्रा तून अनुक्रमे किती प्रतिनिधी निवडले जातात? -B. 48 व 19

Q291. 1837 वर्षी कोणी Land Holders Association ही संघटना स्थापन केली -B. द्वारकानाथ टागोर

Q292. शाहु महाराजांनी शाहुपुरी ही बाजारपेठ कोणत्‍या वर्षी वसविली? -D. 1895

Q293. ईस्ट इंडिया असोसिएशन ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? -B. 1866

Q294. डॉ बाबासाहेब अंबेडकर यांनी ‘बहिष्क़त हितकरणी सभेची स्थापना केंव्हा केली? -A. 1924

Q295. राजर्षी शाहु महाराजांनी ‘क्षाञ जगतगुरू’ मठाचे मठाधिपती म्हणुन कोणाची नेमणुक केली? -B. सदाशिव लक्ष्मण पाटील

Q296. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? -D. गणेश वासुदेव जोशी

Q297. भारताच्या फाळणीची योजना कुणी जाहीर केली? -B. लॉर्ड माउंट बॅटन

Q298. मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? -D. 1884

Q299. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनीधी हजर होते? -C. 72

Q300. स्टोरी ऑफ बार्डोली हा ग्रंथ कोणी लिहिला? -D. महादेव देसाई

Q301. खालीलपैकी कोण 'विकिपिडीया' ह्या सर्वात मोठ्या ऑनलाईन संदर्भ ग्रंथाचे संस्थापक मानले जातात? -B. जिमी बेल्स

Q302. 2012 चे अलिप्त राष्ट्र संघटनेचे (NAM) संमेलन कोणत्या देशात पार पडले? -B. इराण

Q303. 'MGNREGA' अंतर्गत देशात सर्वाधीक मजूरी कोणत्या राज्यात दिली जाते? -C. हरीयाणा

Q304. Earn While You Learn ही अभिनव योजना नोव्हेंबर 2012 मध्ये कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरु केली आहे? -A. पर्यटन मंत्रालय

Q305. भारताच्या महत्वाकांक्षी 'राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियाना' ला कोणाचे नाव देण्यात आले आहे? -B. पं. नेहरू

Q306. World Kidney Day कधी साजरा केला जातो? -C. मार्च 14

Q307. अभिनेता विक्रम गोखले यांना कोणत्या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे? -C. अनुमती

Q308. यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटास जाहीर झाला आहे? -D. इन्वेस्टमेंट

Q309. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) च्या मानव विकास क्रमवारी अहवाल २०१३ नुसार भारताला कितवा क्रमांक मिळाला आहे? -C. १३६

Q310. राजीव ऋण योजना ही कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने नुकतीच सुरु केली आहे? -A. गृह व शहरी विकास मंत्रालय

Q311. रुग्णांच्या दातांचे परीक्षण व उपचार करण्या साठी दंतवैद्यक कोणत्या आरशाचा उपयोग करतात? -A. अंतर्वक्र

Q312. कोणते उपकरण 'परस्पर सामान्य अनुमान' तत्वावर कार्य करते? -B. ट्रान्स फॉर्मर

Q313. 'इलेक्ट्रोन व्होल्ट' eV (Electron volt) हे कशाचे एकक आहे? -A. ऊर्जा

Q314. कोणता आम्ल पदार्थ लाकडी भुशापासून तयार केला जातो? -A. ऑक्सोलिक आम्ल

Q315. खालील पैकी कोणता कॅल्शियम कार्बोनेट चा प्रकार आहे? -C. संगमरवर

Q316. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार ___ हा असतो. -C. रॉट आयर्न

Q317. मधुमेह ___ ह्या द्रव्याच्या कमतरते मुळे होतो. -C. इन्सुलिन

Q318. खालील पैकी कशातील 'क' जीवनसत्व बाष्पनशील नाही? -D. आवळा

Q319. सार्स हा रोग __ वर परिणाम करतो. -श्वसनक्रिया

Q320. २ कि.ग्रॅ. वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 30०C पासून 100०C पर्यंत वाढविण्यासाठी ___ उष्णता लागेल. -A. 140 KCal

Thursday 15 October 2015

हिंगोली जिल्हा

[7:31PM, 15/10/2015] Chhaya mundkar/Mundlod: हिंगोली हा जिल्हा राज्यातील अगदी अलीकडच्या काळात म्हणजे १९९९ साली अस्तित्त्वात आलेला हा जिल्हा असून, संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन असलेल्या “पहिल्या ज्ञानेश्वर चरित्रकाराचा” म्हणजे संत नामदेवांचा हा जिल्हा प्रत्येक मराठी माणसाला वंदनीय आहे. औंढा नागनाथाचे ज्योतिर्लिंग मंदिर हे या जिल्ह्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
हिंगोली जिल्ह्याचा इतिहास

भारताच्या स्वातंत्र्यानंतरही हिंगोली जिल्ह्याचा भाग हा हैद्राबादच्या निजामाच्या ताब्यात होता. मराठवाड्यातील हैद्राबात मुक्तिसंग्रामात हिंगोली, बामणी इत्यादी गावे आघाडीवर होती. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय भागात मराठवाड्यात वसलेला हा या विभागातील आठवा जिल्हा ठरला. इतिहासात हिंगोलीचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. हे शहर स्वातंत्र्याआधी निजामाच्या अधिपत्याखाली होते. विदर्भाच्या सीमेवरील ठिकाण असल्यामुळे, निजामाचा महत्त्वाचा लष्करी तळ या जिल्ह्यात होता. त्या काळात सैन्यदलाला व पशुंना वैद्यकीय सेवा ह्या हिंगोलीतून कार्यरत होत्या. हिंगोलीने दोन मोठी युद्धे अनुभवली आहेत, पहिले १८०३ साली टिपू सुलतान व मराठा यांच्यातील युद्ध तर दुसरे १८५७ साली नागपूरकर व भोसले यांच्यातील युद्ध होय.

लष्करी ठाणे असल्यामुळे, हैद्राबाद राज्यातील हिंगोली हा भाग महत्त्वपूर्ण घटक मानला जात असे. स्वातंत्र्योत्तर काळात हा जिल्हा मुंबई प्रांताच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतर १९६० मध्ये हा भाग परभणी जिल्ह्यात समाविष्ट होतो.तर ३९ वर्षांनंतर म्हनजे १ मे,१९९९ मध्ये हा स्वतंत्र जिल्हा बनविण्यात आला.
पर्यटन:
भारतातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे औंढा- नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे हेमाडपंती मंदिर असून ते द्वादशकोनी व शिल्पसमृद्ध आहे. धर्मराजाने हे मंदिर महाभारतकाळात बांधल्याचं एका आख्यायिकेत म्हटलं आहे.

३०० वर्षांपूर्वीचे मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर जिल्ह्यात शिरड-शहापूर येथे आहे. तर नरसी येथील नृसिंहाचे मंदिर प्रसिद्ध आहे. नरसी हेच संत नामदेवांचे जन्मगाव असल्याचे मानले जाते. तर जवळच बामणी येथील अन्नपूर्णा व सरस्वती देवीची देऊळंही प्रेक्षणीय आहेत.
नामवंत व्यक्तीमत्वे

हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला. संत नामदेवांचे गुरू विठोबा खेचर यांचेही वास्तव्य या जिल्ह्यात होते.

Wednesday 7 October 2015

तुम्ही तुम्हीच बना

                तुम्ही तुम्हीच बना
शिक्षण मुलांना केव्हा सांगेल??  तुम्ही, “तुम्हीच” बना!

महाराष्ट्र टाइम्स मधील, शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा लेख.

मी शाळेत असतांना कोणी प्रमुख पाहुणे आले तर त्यांचे रटाळ भाषण आम्हा विद्यार्थ्यांना शिक्षा दिल्या सारखे ऐकावयाला लावायचे. येणारे प्रत्येक पाहुणे एकच गोष्ट सांगायचे, ‘कोणासारखे तरी बना’, आदर्श व्यक्तिंचे नाव सांगुन तुम्ही तसेच बना.

आज कोणत्याही वक्त्याचे विद्यार्थ्यांनी भाषण ऐकले तर ते कोणाच्या तरी सारखे बनायला सांगतात.

शाळेत मुख्याध्यापक सुध्दा सामुहीक प्राथनेस तेच सांगतात, मुलांनो राम बना! परमहंस बना! विवेकानंद सारखे व्हा!, गांधी सारखे बना!

वर्गात सुध्दा शिक्षक तेच सांगतात. आदर्श व्यक्ती बना. जणू स्वत:खेरीज दुसरं कोणीतरी बनण्यासाठीच विद्यार्थ्यााचा जन्म झाला आहे.

शिवाजी बना! आंबेडकर बना! असे विद्यार्थ्यांना शिकवतो पण शिवाजीचे गुण, आंबेडकरांचे विचार आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कसे निर्माण होतील याचा अंतरभाव शिक्षण अभ्यासक्रमात नाही ना शिक्षण पध्दतीत.

खरं तसं पाहिल तर कोणीही कोणासारखं बनत नसतं. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. प्रत्येक व्यक्ती ही युनिक असते. कितीही प्रयत्न केला तरी कोणी कोणाचीही फोटो कॉपी अथवा झेरॉक्स कॉपी होऊ शकत नाही.

या जगातील प्रत्येक व्यक्ती ही अद्वितीय आहे. रामाला होऊन आज एवढे वर्ष झाले, कोणी बनले रामा सारखे? येशु ख्रिस्ताला होवून एवढी वर्षे लोटली, बुध्द होवून जमाना झाला पण कोणी तसे येशू, बुध्द बनले का? पण मग आपण शाळेत, घरी-दारी सातत्याने कोणाची तरी कॉपी करायला का सांगतो.

आपण आज पर्यंत मुलांना असे म्हटले का नाही की, ‘तुम्ही तुमच्या सारखेच व्हा’. तुम्ही ‘तुम्हीच बना’! गुलाब गुलाबच असतो. लाख प्रयत्न केले तरी तो मोगरा होऊ शकत नाही.

पण आजकालची सर्व शैक्षणिक व्यवस्था, पालक व्यवस्था मोगर्‍याला, ‘गुलाब कसा बनवता येईल’ याच्या प्रयत्नात असते.

आजपर्यंत शिक्षणांन ही हिमंत दाखवलीच नाही की, ‘मुलांनो तुम्ही तुमच्या सारखे व्हा’! तुझं नावं धोंडीराम आहे तर तु धोंडीरामच बन. स्वत:च्याच नावाचा इतिहास कर, दुसर्‍याला कॉपी करु नकोस.

दुसर्‍यांचा आदर्श घेण्यापेक्षा स्वत:चा आदर्श बन. कारण माणसं आदर्शाच्या चौकटीत बसण्यासाठी जन्मलेलेच नाहीत.!

ज्यावेळी आपली शिक्षण पध्दती, आपले टिचर आणि आपले पालक,  प्रत्येक विद्यार्थ्याला “तुम्ही तुम्हीच बना” सांगायची हिम्मत करतील तेव्हा त्या विद्यार्थ्यामधील व्यक्तीचा विकास होईल. यालाच व्यक्तिमत्त्व विकास म्हणतात.

प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक व्यक्ती ही महत्त्वाची आणि मौल्यवान आहे. ह्या निसर्गात जे जे दुर्मिळ असते ते ते मौल्यवान असते. या निसर्गात हिरे-मोती दुर्मिळ मिळतात म्हणून हिर्‍यांना प्रचंड मौल्यवान  समजले जाते मग या निसर्गात एकच ‘सचिन जोशी’ आहे, एकच ‘तुम्ही आहेत’. तुमच्या सारखा मास्टर पिस याजगात शोधून सापडणार नाही. मग जे एक आहे ते दुर्मिळ आहे आणि जे दुर्मिळ आहे ते मौल्यवान आहे.

म्हणून प्रत्येकाला मनापासून असे वाटले पाहिजे की मी महत्त्वाची, मौल्यवान व अद्वितीय व्यक्ती आहे. माझी तुलना दुसर्‍यांबरोबर होवू शकत नाही. जेव्हा हा विचार शिक्षणपध्दती प्रभावीपणे विद्यार्थ्यांमध्ये रुजवेल तेव्हा प्रत्येक विद्यार्थी अधिक आनंदी आणि आदर्श व्यक्ति असेल.

दुसर्‍यांना कॉपी करण्याच्या भांनगडीत पडणार नाही, मी नेहमी विद्यार्थ्यांना एक कविता ऐकवत असतो,
‘हातात ठेवून दहा हिरे,
पहा जरा आरशाकडे,
अकरावा दिसेल कोहीनूर,
लक्ष जाता स्वत:कडे."

त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक कोहीनूर लपला आहे पण पालकांना, शिक्षकांना तो दिसत नाही. प्रत्येक मुलामध्ये एक हुशार मुल दडलं असतं. आपल्याला फक्त त्याची मूळ प्रतिभा शोधून काढायची असते.

पण आपण सातत्याने विद्यार्थ्यांना एक सारखे छाप बनवत असतो. एकाच पॅटर्नमध्ये आपण त्यांना बसवतो. आपले सारे प्रयत्न त्यांना एकाच साच्यात टाकण्याचे असतात.

राम चांगला आहे, कृष्ण सुंदरच आहे, पैगंबर उत्तमच आहे, येशु अप्रतिम आहे, बुध्द अद्वितीयच आहे पण या व्यतीरीक्त एक वेगळा स्वंतत्र व्यक्ती होण्यात एक वेगळीच मजा आहे.

एखादा व्यक्ती गांधीची कॉपी करु लागला तर अडचणी निर्माण होवू शकते. खरं तर आपण त्यांच्या मार्गांवर चालून स्वत:चा एक नविन मार्ग का बनवू शकत नाही?

तो मार्ग बनविण्याची हिम्मंत शाळेने दिली पाहिजे. शिक्षकाने सांगितले पाहिजे, ‘सर्व आदर्श व्यक्तींचे विचार समजून घे आणि त्यातून स्वत:ची एक विचार सरणी बनवं, मेढंरासारखं अनुसरण करु नको.’

त्यामुळे गुलाबाला कमळ बनवायला सांगू नका याने कमळ त्याची सर्व उर्जा सर्व शक्ती गुलाब होण्यात घालवेल. आणि शेवटी तो गुलाब तर होणार नाही पण कमळ बनण्याची दाट शक्यता होती ती पण नष्ट होईल.

यशवंतराव चव्हाण यांची एक गोष्ट वाचण्यात आली होती, यशवंतराव जेव्हा लहान होते तेव्हा शाळेत तपासणीस (स्कूल इन्सपेक्टर) आले होते. त्यांनी प्रत्येकाला विचारले तुम्हाला मोठेपणे काय व्हायचे? कोणी म्हणे, ‘मला शिवाजी व्हायचे,’ कोणी म्हणे, ‘मला टिळक व्हायचे’ पण जेव्हा या मुलाला विचारले की, ‘बाळा तुला मोठेपणी काय व्हायाचे?’ तेव्हा हा आठवीतला मुलगा म्हणाला, ‘मला यशवंतराव चव्हाणच व्हायचे आहे’.

माझ्या मते आपल्या विद्यार्थ्यांना सुध्दा ‘तुम्ही,तुम्हीच बना’ हे सांगू. प्रत्येक घरात, प्रत्येक शाळेत हा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजला तर अधिक आनंदी, यशस्वी माणसं बनण्याची दाट शक्यता आहे.
👏👏👏👏👏👏👏👏
नक्की वाचा... आणि शिक्षक
व पालकांना वाचायला द्या.....
💠💠💠💠💠💠💠💠

Saturday 3 October 2015

ग्रामसभेचे महत्व

ग्रामसभा

जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात.

माणूस १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नाही. गावातील प्रत्येक मतदार नागरिक हा ग्रामसभेचा सदस्य आहे.

ग्रामसभेत हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत, विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास / नापास करण्याचा, मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.

जसे हे अधिकार आहेत तसेच हे अधिकार बजावण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. गावातील ग्रामपंचायत आपण सांगतो तशी चालविणे, चालते कि नाही हे पाहणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.

ग्रामसभेत जे ठरेल, जे ठराव होतील त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. जर ग्रामसभेला गेलो नाही, आपण सांगतो त्याप्रमाणे ठराव करून घेतले नाहीत, तर ग्रामपचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच व सदस्यांचा मनमानी कारभार चालेल.

अनेक गावात प्रत्यक्षात ग्रामसभा होत नाहीत. ग्रामसभेच्या ८ दिवस आधी लोकांच्या सह्या घेतल्या जातात, किंवा खोट्या सह्या / अगन्ठे  घेतात. व सरपंच / ग्रामसेवक मनानेच खोटे ठराव घेवून पंचायत समितीत पाठवून देतात. यामुळे प्रत्यक्षात गावात फार मोठा भ्रष्टाचार होवूनही लोकांना माहिती असू शकत नाही.

वर्षातून किमान ६ ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. ६ पेक्षा जास्त घेतल्या तर हरकत नाही. पैकी ४ ग्रामसभांच्या तारखाही फिक्स आहेत.

२६ जानेवारी            - प्रजासत्ताक दिन
१   मे                       - कामगार दिन
१५ ऑगस्ट              - स्वातंत्र्य दिन
२   ऑक्टोबर           - गांधी जयंती

या दिवशी ग्रामसभा भरविणे बंधनकारक आहे. ग्रामसभेची नोटीस हि सभेच्या तारखेपूर्वी १० दिवस आधी बजावावी लागते. नोटीस हि ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सर्वाना पाहता येईल, व सहजपणे वाचता येईल अशा ठिकाणी लावून प्रसिद्ध करावी लागते. तसेच सभेच्या ८ दिवस अगोदर व सभेच्या एक दिवस अगोदर अश दोन वेळा प्रत्येक वार्डात, वाडीत सविस्तर दवंडी हि द्यावी लागते.

सभेचा अध्यक्ष

 आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तसेच निवडणुकीनंतरचा पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. सरपंचांच्या गैरहजेरीत उपसरपंच हा अध्यक्ष असतो बाकी उर्वरित ग्रामसभेचा अध्यक्ष मतदारांनी बहुमताने निवडून दिलेला व्यक्ती हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो.

ग्रामसभेत कसे बोलावे ?

ग्रामसभेत मतदारांना बोलण्याचा अधिकार आहे. मतदारांनी ग्रामसभेच्या अध्यक्षाची परवानगी घेवून बोलावे तसेच उभे राहून अध्यक्षांना अध्यक्ष महाराज असे संबोधून त्यांचेकडे पाहून बोलावे. अध्यक्षांनी सुद्धा माहिती विचारणाऱ्याकडे पाहून बोलावे.

सभेत मतदारांच्या प्रश्नाला फक्त अध्यक्षच उत्तर देवू शकतात. इतरांना उत्तरे देण्याचा अधिकार नाही.

सभेचे कामकाज

ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव असतो. ग्रामसभेचे इतिवृत्त सचिव तयार करून व्यवस्थित ठेवतो. मात्र त्याच्या अनुपस्थित अध्यक्ष सांगेल तो शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका या सारख्या शासकीय/ निमशासकीय / ग्रामपंचायत कर्मचारी तयार करील.

अत्यंत महत्वाचे -

पुढील ग्रामसभेत ज्या विषयांचे ठराव व्हावेत असे आपणास वाटते, त्याचे निवेदन तयार करून तसा विनंती अर्ज सभेच्या ८ दिवस आधी ग्रामपंचायतीत जमा करून त्याची पोच घ्यावी.

ग्रामसभेत ठराव मांडावा, त्यावर बहुमत घेण्यास भाग पाडावे. ठराव पास . नापास झालेला प्रोसिडिंग बुक मध्ये लिहिला कि नाही. ठराव जसा झाला तसाच लिहिला कि बदल करून लिहिला हे शिकलेल्या मुलाकडून मोठ्याने वाचून घ्यावे. अन्यथा ठराव होवूनही प्रोसिडिंग बुकात न लिहिणे किंवा चुकीचा लिहिणे हे प्रकार सर्रास घडतात.

ग्रामसभेत आपण रस्ता, पाणी, गटार, वीज, शिक्षण, आरोग्य, शौचालये, रेशन, रोजगार, घरकुले, असे कोणतेही नागरी, सार्वजनिक हिताचे प्रश्न उपस्थित करू शकतो व त्यावर चर्चा घडवून आणू शकतो व ठराव करण्यास भाग पडू शकतो.

आपण जर नियमितपणे ग्रामसभेत उपस्थित राहिलो व ग्रामसभेत सहभाग दिला व ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केला तर आपणास गावातील कोणत्याही अडचणीसाठी तालुका, जिल्ह्याच्या गावी जाण्याची गरज नाही.

आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेणे बंधनकारक आहे. तसेच उर्वरित ग्रामसभा इंग्रजी मुळाक्षरांच्या (अल्फाबेटिकल्स प्रमाणे) अद्याक्षरांप्रमाणे इतर वाडे, वस्तीवर घ्याव्यात.

आपण जर निवेदन दिले कि, अमुक तारखेला अमुक वाजता, अमुक या ठिकाणी ग्रामसभा घ्यावी, तर त्या प्रमाणे ग्रामसभा घ्यावी लागते.

आपण जर ग्रामसभेला गेलो तर आपला रोज बुडेल असे वाटत असेल तर आदल्या ग्रामसभेला पुढील ग्रामसभेची वेळ ठरवून घ्यावी. किंवा निवेदन देवून सांगावे.

संध्याकाळी किंवा सकाळी लवकर देखील मतदारांच्या सोयीच्या वेळेत ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.

जर ग्रामसभेच्या दिवशी लग्न / मयत किंवा महत्वाचे कार्यक्रम असतील तर निवेदन देवून नागरिकांच्या सोयीच्या दिवशी ग्रामसभा भरविण्यास सुचवता येवू शकते.

प्रत्येक  ग्रामसभेपुर्वी एक दिवस अगोदर महिलांची ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. त्या सभेमध्ये पारित झालेले ठराव जसेच्या तसे ग्रामसभेने मान्य करावे लागतात.

Friday 2 October 2015

आजचे ताजे updates

मगी ९६६५८७७८८९: 💐🌷🌷🎯🎯🎯🌷🌷💐

 ⏰ चालू घडामोडी ⏰

💎 स्पर्धापरीक्षाविशेष 💎

💠२ ऑक्टोबर २०१५💠

🎯🎯सानिया आणि मार्टिना वुहान ओपन डब्ल्यूटीए स्पर्धेच्या उपांत्यफेरीत :

भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने वुहान ओपन डब्ल्यूटीए स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली.

अव्वल मानांकित सानिया आणि हिंगीस यांनी उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित प्राप्त अमेरिकेच्या राकेल कोप्स जोन्स आणि एबिगेल स्पीयर्सचा 6-2, 6-2 असा पराभव केला.

दुसऱ्या फेरीत त्यांनी क्लाउडिया जान्स इग्नासिक आणि अनास्तासिया रोडियोनोव्हा यांचा 6-3, 6-2 असा पराभव केला होता, तर पहिल्या फेरीत त्यांना बाय मिळाला होता.

सानिया-हिंगीस जोडीने या वर्षी विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन विजेतेपद पटकावलेले आहे.
#################

🎯🎯देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय धोरण :

देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी पुढील वर्षी नवे सर्वंकष राष्ट्रीय धोरण आणण्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरणमंत्री थावरचंद गहलोत यांनी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात केली.

लवकरच नवे राष्ट्रीय धोरण अवलंबले जाईल.

समाजाने वृद्धांकडे लक्ष देण्याची आवश्यकता लक्षात घेता नवे धोरण त्या दिशेने ठोस पाऊल टाकणारे ठरेल.

समाजातील बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमुळे नव्या राष्ट्रीय धोरणाची गरज प्रतिपादित करताना त्यांनी वृद्धांना अधिक सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.

सरकारने याआधीच स्वयंसेवी संस्था आणि अन्य घटकांकडून सूचना आणि शिफारशी मागितल्या आहेत.

1999 मध्ये अवलंबण्यात आलेल्या राष्ट्रीय धोरणाची जागा नव्या सर्वसमावेशक धोरणाने घेतलेली असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
#################

🎯🎯वरूड तालुक्यात राज्यातील पहिला डिहायड्रेशन प्रकल्प उभारला :

विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा उत्पादकांची ससेहोलपट थांबविण्यासाठी वरूड तालुक्यात राज्यातील पहिला डिहायड्रेशन प्रकल्प उभारला जाणार आहे.

तसेच मोर्शी तालुक्यात संत्रा रस प्रक्रिया केंद्रही सुरू केली जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित राष्ट्रीय कृषी व संत्रा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली.

युती शासन जलयुक्त शेतशिवाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन देण्याचा प्रयत्न करीत आहे.

सहा हजार गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे.

संत्र्याला बाजारपेठ मिळाली पाहिजे, याकरिता राज्यातील 10 शहरांमध्ये जागा उपलब्ध करुन देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
#################


🎯🎯अभिनेते प्रशांत दामले यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत :

मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, अक्षय कुमार यांच्यापाठोपाठ आता अभिनेते प्रशांत दामले यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत दिली आहे.

प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला असून जलयुक्तशिवार योजनेसाठी ही मदत वापरली जाणार आहे.

पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात भीषण दुष्काळाचे सावट असून दुष्काळग्रस्तांसाठी सिने व क्रीडा क्षेत्रातील मंडळी सरसावली आहेत मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांनी 'नाम' संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत करायला सुरुवात केली आहे.

अक्षय कुमारनेही दुष्काळग्रस्तांना 90 लाख रुपयांची मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

या यादीत आता प्रशांत दामले यांचाही समावेश झाला आहे. दामले यांनी एक लाख रुपयांची मदत दिली आहे.
#################

🎯🎯दिनविशेष

1869 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरातमधील पोरबंदर येथे जन्म

1904 : माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म
#################
संकलन-गुरुशांत मगी ९६६५८७७८८९
💐🌷🌷🎯🎯🎯🌷🌷💐
[20:00, 10/2/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 🎯🎯MPSC लिपिक प्रवेशपत्र उपलब्ध :

पदाचे नाव : लिपिक-टंकलेखक

अधिकृत संकेतस्थळ : www.mahampsc.mahaonline.gov.in

🌷🙏🏻कृपया पुढे पाठवा 🙏🏻🌷

➕➖➕➖➕➖➕➖➕
[20:47, 10/2/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 🎯🎯तलाठी परीक्षा २०१५  निकाल जाहीर


13 सप्टेंबरला झालेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. काही जिल्ह्यांचा निकाल लागलाय आणि काही लवकरच लागतील.

तरी तुम्ही ज्या जिल्ह्याच्या लिंक्स
 वर जावून फॉर्म भरलेले आहात अधिकृतपणे तेथूनच निकाल  डाऊनलोड करा. धन्यवाद..
निकाल लागलेले जिल्हेः
चंद्रपुर ,चंद्रपुर  ,हिंगोली , नांदेड, गडचिरोली, भंडारा ,    ठाणे , लातूर , ठाणे ,     वर्धा , उस्मानाबाद ,     उस्मानाबाद , नांदेड , भंडारा , परभणी,     रायगड, हिंगोली ,     पालघर , सिंधुदुर्ग , वाशिम, जालना , वाशिम  अमरावती , जालना , अकोला,
     बीड , लातूर

➕➖➕➖➕➖➕➖➕
   
[20:49, 10/2/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 🎯🎯बॉम्बे हाय कोर्ट लिपिक निकाल जाहीर

पद संख्या : 400 जागा

पदाचे नाव : लिपिक-टंकलेखक

अधिकृत संकेतस्थळ : www.bombayhighcourt.nic.in

➕➖➕➖➕➖➕➖➕
[20:52, 10/2/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 🎯🎯केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०१५

पद संख्या : 38 जागा

पदाचे नाव व संख्या :

प्राध्यापक (इकॉनॉमिकस) : 1 जागा
     सहाय्यक प्राध्यापक (सर्जरी) : 10 जागा
     सहाय्यक प्राध्यापक (पी.एम.आर) : 9 जागा
     सहाय्यक विधान मंडळ (कन्नड) : 1 जागा
     नाविक सर्व्हेअर- कम- उपसंचालक (साधारण) (तांत्रिक) : 15 जागा
     पशुधन अधिकारी : 2 जागा अर्ज पद्धती : अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा
     अधिकृत संकेतस्थळ : www.upsconline.nic.in
     अर्ज करण्याची अंतिम तारीख : 9 ऑक्टोबर 2015

➕➖➕➖➕➖➕➖➕
[20:56, 10/2/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 🎯🎯यशादा पुणे भरती 2015 :

पद संख्या : 77 जागा
     अर्ज पद्धती : अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा
     अधिकृत संकेतस्थळ : www.upsconline.nic.in
     अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2015


➕➖➕➖➕➖➕➖➕
[21:04, 10/2/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 🎯🎯परभणी जिल्हा अधिकारी कार्यालय भरती २०१५

पद संख्या : ४ जागा
     पदाचे नाव : तांत्रिक अधिकारी
     अर्ज पद्धती : अर्ज विहित नमुन्यात पोस्टाने पाठवावे
     अर्ज़ करण्याची अंतिम तारीख : १५ ऑक्टोबर २०१५


➕➖➕➖➕➖➕➖➕

गांधीजी उवाच

GANDHI JAYANTI 2015 SLOGAN

#The best way 2 find urself is 2 lose urself in the service of others…

#An ounce of practice is worth more than 2ns of preaching…

#Truth st&s, even if there be no public support. It is self-sustained…

#I suppose leadership at one time meant muscles; but 2day it means getting along with people...

#Non-violence requires a double faith, faith in God & also faith in man…

#Happiness is when what u think, what u say, & what u do are in harmony…

#The greatness of a nation can be judged by the way its animals are treated…

#Peace is the most powerful weapon of mankind. It takes more courage 2 take a blow than 2 give one…

#Honest differences are often a healthy sign of progress…

#Live as if u were 2 die 2morrow. Learn as if u were 2 live forever…

नमस्कार सर्वांना .................................................... welcome all of you