Showing posts with label ताज्या बातम्या. Show all posts
Showing posts with label ताज्या बातम्या. Show all posts

Friday, 2 October 2015

आजचे ताजे updates

मगी ९६६५८७७८८९: 💐🌷🌷🎯🎯🎯🌷🌷💐

 ⏰ चालू घडामोडी ⏰

💎 स्पर्धापरीक्षाविशेष 💎

💠२ ऑक्टोबर २०१५💠

🎯🎯सानिया आणि मार्टिना वुहान ओपन डब्ल्यूटीए स्पर्धेच्या उपांत्यफेरीत :

भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने वुहान ओपन डब्ल्यूटीए स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली.

अव्वल मानांकित सानिया आणि हिंगीस यांनी उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित प्राप्त अमेरिकेच्या राकेल कोप्स जोन्स आणि एबिगेल स्पीयर्सचा 6-2, 6-2 असा पराभव केला.

दुसऱ्या फेरीत त्यांनी क्लाउडिया जान्स इग्नासिक आणि अनास्तासिया रोडियोनोव्हा यांचा 6-3, 6-2 असा पराभव केला होता, तर पहिल्या फेरीत त्यांना बाय मिळाला होता.

सानिया-हिंगीस जोडीने या वर्षी विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन विजेतेपद पटकावलेले आहे.
#################

🎯🎯देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय धोरण :

देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी पुढील वर्षी नवे सर्वंकष राष्ट्रीय धोरण आणण्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरणमंत्री थावरचंद गहलोत यांनी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात केली.

लवकरच नवे राष्ट्रीय धोरण अवलंबले जाईल.

समाजाने वृद्धांकडे लक्ष देण्याची आवश्यकता लक्षात घेता नवे धोरण त्या दिशेने ठोस पाऊल टाकणारे ठरेल.

समाजातील बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमुळे नव्या राष्ट्रीय धोरणाची गरज प्रतिपादित करताना त्यांनी वृद्धांना अधिक सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.

सरकारने याआधीच स्वयंसेवी संस्था आणि अन्य घटकांकडून सूचना आणि शिफारशी मागितल्या आहेत.

1999 मध्ये अवलंबण्यात आलेल्या राष्ट्रीय धोरणाची जागा नव्या सर्वसमावेशक धोरणाने घेतलेली असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
#################

🎯🎯वरूड तालुक्यात राज्यातील पहिला डिहायड्रेशन प्रकल्प उभारला :

विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा उत्पादकांची ससेहोलपट थांबविण्यासाठी वरूड तालुक्यात राज्यातील पहिला डिहायड्रेशन प्रकल्प उभारला जाणार आहे.

तसेच मोर्शी तालुक्यात संत्रा रस प्रक्रिया केंद्रही सुरू केली जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित राष्ट्रीय कृषी व संत्रा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली.

युती शासन जलयुक्त शेतशिवाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन देण्याचा प्रयत्न करीत आहे.

सहा हजार गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे.

संत्र्याला बाजारपेठ मिळाली पाहिजे, याकरिता राज्यातील 10 शहरांमध्ये जागा उपलब्ध करुन देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
#################


🎯🎯अभिनेते प्रशांत दामले यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत :

मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, अक्षय कुमार यांच्यापाठोपाठ आता अभिनेते प्रशांत दामले यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत दिली आहे.

प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला असून जलयुक्तशिवार योजनेसाठी ही मदत वापरली जाणार आहे.

पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात भीषण दुष्काळाचे सावट असून दुष्काळग्रस्तांसाठी सिने व क्रीडा क्षेत्रातील मंडळी सरसावली आहेत मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांनी 'नाम' संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत करायला सुरुवात केली आहे.

अक्षय कुमारनेही दुष्काळग्रस्तांना 90 लाख रुपयांची मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

या यादीत आता प्रशांत दामले यांचाही समावेश झाला आहे. दामले यांनी एक लाख रुपयांची मदत दिली आहे.
#################

🎯🎯दिनविशेष

1869 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरातमधील पोरबंदर येथे जन्म

1904 : माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म
#################
संकलन-गुरुशांत मगी ९६६५८७७८८९
💐🌷🌷🎯🎯🎯🌷🌷💐
[20:00, 10/2/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 🎯🎯MPSC लिपिक प्रवेशपत्र उपलब्ध :

पदाचे नाव : लिपिक-टंकलेखक

अधिकृत संकेतस्थळ : www.mahampsc.mahaonline.gov.in

🌷🙏🏻कृपया पुढे पाठवा 🙏🏻🌷

➕➖➕➖➕➖➕➖➕
[20:47, 10/2/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 🎯🎯तलाठी परीक्षा २०१५  निकाल जाहीर


13 सप्टेंबरला झालेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. काही जिल्ह्यांचा निकाल लागलाय आणि काही लवकरच लागतील.

तरी तुम्ही ज्या जिल्ह्याच्या लिंक्स
 वर जावून फॉर्म भरलेले आहात अधिकृतपणे तेथूनच निकाल  डाऊनलोड करा. धन्यवाद..
निकाल लागलेले जिल्हेः
चंद्रपुर ,चंद्रपुर  ,हिंगोली , नांदेड, गडचिरोली, भंडारा ,    ठाणे , लातूर , ठाणे ,     वर्धा , उस्मानाबाद ,     उस्मानाबाद , नांदेड , भंडारा , परभणी,     रायगड, हिंगोली ,     पालघर , सिंधुदुर्ग , वाशिम, जालना , वाशिम  अमरावती , जालना , अकोला,
     बीड , लातूर

➕➖➕➖➕➖➕➖➕
   
[20:49, 10/2/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 🎯🎯बॉम्बे हाय कोर्ट लिपिक निकाल जाहीर

पद संख्या : 400 जागा

पदाचे नाव : लिपिक-टंकलेखक

अधिकृत संकेतस्थळ : www.bombayhighcourt.nic.in

➕➖➕➖➕➖➕➖➕
[20:52, 10/2/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 🎯🎯केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०१५

पद संख्या : 38 जागा

पदाचे नाव व संख्या :

प्राध्यापक (इकॉनॉमिकस) : 1 जागा
     सहाय्यक प्राध्यापक (सर्जरी) : 10 जागा
     सहाय्यक प्राध्यापक (पी.एम.आर) : 9 जागा
     सहाय्यक विधान मंडळ (कन्नड) : 1 जागा
     नाविक सर्व्हेअर- कम- उपसंचालक (साधारण) (तांत्रिक) : 15 जागा
     पशुधन अधिकारी : 2 जागा अर्ज पद्धती : अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा
     अधिकृत संकेतस्थळ : www.upsconline.nic.in
     अर्ज करण्याची अंतिम तारीख : 9 ऑक्टोबर 2015

➕➖➕➖➕➖➕➖➕
[20:56, 10/2/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 🎯🎯यशादा पुणे भरती 2015 :

पद संख्या : 77 जागा
     अर्ज पद्धती : अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा
     अधिकृत संकेतस्थळ : www.upsconline.nic.in
     अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2015


➕➖➕➖➕➖➕➖➕
[21:04, 10/2/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 🎯🎯परभणी जिल्हा अधिकारी कार्यालय भरती २०१५

पद संख्या : ४ जागा
     पदाचे नाव : तांत्रिक अधिकारी
     अर्ज पद्धती : अर्ज विहित नमुन्यात पोस्टाने पाठवावे
     अर्ज़ करण्याची अंतिम तारीख : १५ ऑक्टोबर २०१५


➕➖➕➖➕➖➕➖➕